खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी गजाआड; महाड मध्ये पाच आरोपीना घेतले ताब्यात
मिलिंद पवार – ग्रामीण प्रतिनिधी महाड
महाड तालुक्यातील टोळ खु या ठिकाणी खवल्या मांजराची विक्री होणार असल्याचे वन विभागाला समजताच वन विभागाने टाकलेल्या धाडीत खवल्या मांजराची विक्री करणाऱ्या पाच जणांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे, महाड वन विभागाअंतर्गत खवल्या मांजराची तस्करी हा एक मोठा गहन प्रश्न बनला आहे, गेली दोन वर्षातील हि तिसरी कारवाई आहे. भोर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. मिसाळयांना वन्य प्राण्यांचा तस्करी होत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरंधा घाट येथे गस्त घातली, मात्र संबंधित संशयित व्यक्तीने महाड जवळील टोळ खु. या ठिकाणी खवल्या मांजराची विक्री होणार असल्याची माहिती प्राप्त होताच महाडवनपरिक्षेत्र अधिकारी राकेश साहू यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून भोर आणि महाडच्या एस.एस. मिसाळ – भोर वनपरिक्षेत्र अधिकारी, महाड वन क्षेत्र अधिकारी राकेश साहू , संदीप परदेशी वनरक्षक दहीवड, रोहिदास पाटील वनरक्षक महाड, समीर जाधव वनरक्षक मोहोत या वनविभागाकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
यावेळी गुन्ह्यात वापण्यात आलेल्या तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या, वन विभागाने टाकलेल्या धाडीत सुनील भाऊ वाघमारे रा भेलोशी – महाड, सतीश कोंडीराम साळुंखे कुंभेशिवथर – महाड, सुरज संतोष ढाणे निनामपाडळी – सातारा, देविदास गणपत सुतार टोळखु महाड, शुभम प्रशांत ढाणे निनामपाडळी – सातारा, यांच्यासह त्यांच्या ताब्यातील एम. एच. ११ सी. एफ. ६८०४, एम. एच. १२ ए जी२१३१, एम.एच. ०६ बी. वाय. ६२ ९ ० या दुचाकी, रानडुकराचा सुळा, संशयित पावडर असा माल ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव सरंक्षण अधिनियम १ ९ ७२ कलम ९ , ३ ९ ( अ ) , ३ ९ ( २ ) ( ३ ) , ४४ ( १ ) , ( ४ ) , ५१ तसेच मुंबई वन्य जीव सरंक्षण अधिनियम १ ९ ५१ चे कलम १ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक १३ जानेवारी पर्यंत सर्वआरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

