ब्रेकिंग

महाबळेश्वर मध्ये गारांचा पाऊस! पर्यटकांची धांदल, स्ट्रॉबेरीलाही फटका

 

किशोर सपकाळ – शहर प्रतिनिधी महाबळेश्वर

महाबळेश्वर: 20 एप्रिल 2024 रोजी सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीत तुफान पाऊस झालाय. सोसाट्याच्या वाऱ्यासह यावेळी गारांचा पाऊस महाबळेश्वर या भागात नोंदवला गेला.

अचानक आलेल्या गारांचा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची एकच धांदल उडाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचाही खोळंबा झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

या दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारा पडल्यामुळे महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीचं प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे. स्ट्रॉबेरी पिकांचं नुकसान झाल्यानं व्यापारी आणि स्ट्रॉबेरी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा पसरलाय. वाढलेल्या तापमानात लक्षणीय प्रमाणात घट पाऊस झाल्यामुळे नोंदवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!