महाडमधील महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उदघाटन
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते व युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अब की बार मोदी सरकार, अब की बार ४०० पार अशा घोषणा देत महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आमदार गोगावले यांनी महायुतीच्या संपर्क कार्यालयात युतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी यांनी बसून प्रचाराचे नियोजन करावे असे आवाहन करीत महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी महाड मतदार संघातून ४० हजारापेक्षा जास्त मताधिक्य द्यायचे आहे असे स्पष्ट करीत लवकरच महाड शहरातील प्रचार सभेचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सावंत, भाजपचे उपजिल्हा प्रमुख बिपीन म्हामुणकर, मनसेचे चेतन उतेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांतबुवा जाधव, मेहबुब कडवेकर, महम्मद अली पल्लवकर, भाजपचे डॉ. जोगळेकर, महेश शिंदे, आरपीआयचे मोहन खांबे, केशव हाटे आदी आजी माझी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



