शिवथर नदी पात्रातील गाळ काढण्याचा कामाचा विकास गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ
शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे शिवथर घळई कडून येणाऱ्या नदीपात्राची वाढणार खोली
अभिजीत ढाणीपकर – शहर प्रतिनिधी महाड
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून आणि शिवथर घळ परिसरातील डोंगर माथ्यावरून दगड धोंडे आणि माती येऊन नदी पात्राची खोली कमी झाल्यामुळे पुराचे पाणी नदीपात्राच्या बाहेर फेकल्या जात होते, सदर गाळ काढल्यामुळे पाण्याचा प्रवाह नदी पात्राच्या बाहेर इतरत्र नजाता सुरळीत मार्गाने जाईल आणि त्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूच्या संबंधित शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान होणार नाही याचा विचार करूनच केलेल्या प्रयत्नांमुळे सदर नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाचा आज रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या शुभारंभावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले तसेच या भागातील सरपंच उपसरपंच आणि विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी–माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी या भागातील ग्रामस्थांच्या वतीने रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून आभार मानण्यात आले.




