महाड मध्ये हनुमान जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी
मनसे तर्फे सामुहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
महाड दि. 16 एप्रिल रोजी संपूर्ण महाड शहर आणि तालुक्यामध्ये हनुमान जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचंड उत्साहात आणि तेवढ्याच भक्ती भावांत साजरी करण्यात आली.
शनिवारी पहाटे पासून लाडक्या राम भक्त हनुमानाच्या प्रतिमेला विधीवत अभिषेक पूजा भक्ती भजन करून सजवण्यात आल. शहरांतील नवेनगर, तांबट भूवन, गवळ आळी, घरटकर आवाड, काकरतळे आदी ठिकाणच्या मंदिरात जंयती उत्सवाच आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आल होत तर ओम विराट चॅरिटबल ट्रस्ट्च्या वतीने चांभार गडावर हनुमान जंयती उत्सव साजरा करण्यात आला होता, या ठिकाणी भक्तांसाठी महाप्रसादाच आयोजन करण्यात आल होत.

सांयकाळी उशिरा पर्यंत भक्त चांभारगड चढून हनुमानाच दर्शन घेत होते, शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या लोकमान्य व्यायाम शाळे तर्फे सायंकाळी शहरांतून हनुमानांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, अशा प्रकारे दिवसभर धार्मिक कार्यक्रमा सह हनुमान जयंतीच आयोजन सर्वत्र करण्यात आले.
हनुमान जयंती निमित्त विराट चॅरिटेबल ट्रस्टच्या काळधोंड येथील हनुमान मंदिराखाली सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड उप जिल्हा अध्यक्ष चेतन उतेकर यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक हनुमान चालीसाच सामुहिक पठण करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष पंकज उमासरे, उपाध्यक्ष दिपक चव्हाण, महिला शहर अध्यक्ष प्रतिक्षा कुलकर्णि, उपाध्यक्ष लावण्य शिगवण, लक्ष्मण कंक, विवेक ठोंबरे, यश जाधव, संकेत वडके, अनिल कांबळे, गोविंद उतेकर, डॉ. पवार, तुक्षार मेस्री, जयपाल रावल, इश्वर पटेल, चंद्रहास नगरकर आदी उपस्थित होते.



