राजकिय
किंजळोली मोहल्ला बुद्रुक येथील असंख्य युवा काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
नितेश पवार - ग्रामीण प्रतिनिधी बिरवाडी
महाड तालुका किंजळोली येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले हे करत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवत आम्ही शिवसेनेत प्रवेश करतआहोत असे प्रवेश कर्त्यांनी यावेळी सांगितले.
या पक्षप्रवेश समारंभावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य , विभाग प्रमुख आणि विभागातील शिवसेनायुवा सेनेचे आजी–माजी पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.
