जिल्हा

जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघात रोखण्याच्या उपाययोजनांवर चर्चा

अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’चे संयुक्त सर्वेक्षण करत उपाययोजना निश्चित करा - जिल्हाधिकारी किशन जावळे

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

रायगड: दि. 29 मुंबई-गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट) अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्चित कराव्यात; त्यासाठी संबंधित महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,अधीक्षक अभियंता, रायगड सा.बां.मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई श्रीमती सुषमा गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जगदीश सुखदेवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदी उपस्थित होते.

या बैठकीत रायगड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील ब्लॅक स्पॉट व अपघातप्रवण क्षेत्र ची अद्ययावत यादी व त्याचे Location संबंधित विभागाला अवगत केल्याबाबतचा आणि अस्तित्वातील अरुंद रस्त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी बृहत आराखडा तयार करणेबाबतचा आढावा घेण्यात आला. तसेच  द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेकरीता पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधा व साधनसामुग्री याबाबतचा आढावा व Blackspot बाबतची माहिती देण्यात आली.

साखळी क्रमांक 0/00 ते 84/00 या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत पळस्पे ते इंदापूर या रस्त्यावरील Blackspot बाबतची माहिती व अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून ठोस केलेल्या  कार्यवाहीबाबतचे समितीपुढे सादरीकरण व अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. साखळी क्रमांक 84/00 ते 154/300 या मार्गावरील अपघात कमी करण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केलेल्या ठोस उपाययोजना याबाबतचे सादरीकरण व Blackspot बाबतची माहिती देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!