तालुका

उन्हाळी सुट्‌टीतील अनोखा उपक्रमामुळे – शाळेच्या पटसंख्येत झाली विक्रमी वाढ

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्येत दिवसेंदिवस घट होत असतानाच रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा – गांधारपाले येथील पदवीधर शिक्षक प्रकाश धाटावकर यांच्या उन्हाळी सु‌ट्टीतील अनोख्या उपक्रमातून व अविरत प्रयत्नातून त्याच बरोबर संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, व्यवस्थापन समिती आणि पालक वर्ग यांच्या अनमोल सह‌कार्यातून शाळेच्या पटसंख्येत विक्रमी वाढ करण्यात आली आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी सुसज्ज व्हर्च्युअल व महाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्हा परिषदे कडून सन्मानीत करण्यात आलेली असताना, देखील या गावातील काही मुले आजुबाजूच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व महाड मधील काही शाळांमध्ये शिक्षण घेत होते. या मुलांना गावातील जिल्हा परिषद शाळेत आणण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जात होते, परंतु प्रतिसाद मात्र फारसा मिळत नव्हता. या सर्व गोष्टींचा नियोजनपूर्वक विचार करून या शाळेतील‌ पदवीधर – शिक्षक प्रकाश धाटावकर यांनी उन्हाळी सुट्टीमध्ये एक अनोखा उपक्रम हाती घेतला. सतत पालक संपर्क, गृहभेटीतून पालकांचे प्रबोधन करून आपल्या गावातील शाळेचे महत्व व शाळेने विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न यांची कल्पना देऊन इंग्रजी माध्यमांसह वेगवेग‌ळ्या शाळेत जाणाऱ्या एकुण २५ नवीन विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करुन घेतले आणि शाळेची ३७ वरून ६२ इतकी विक्रमी पटसंख्या केली.

या कामी गांधारपाले ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव पवार, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सहदेव उतेकर, उपाध्यक्षा साक्षीताई बाईत, सर्व सदस्य, गावचे अध्यक्ष महादेव जाधव, अंगणवाडी सेविका अपेक्षा घाणेकर आणि गावातील सर्व मान्यवरांनी सरांसोबत गावात स्वतः गृहभेटी दिल्या व पालकांना आपल्या शाळेचे महत्व पटवून दिले, त्याच बरोबर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, तरुण मित्र मंडळ, पालक वर्ग यांचे या कामी मोलाचे सह‌कार्य मिळाले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा शुभारंभाच्या – निमित्ताने शिक्षक प्रकाश धाटावकर यांच्या अविरत प्रयत्नातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, छत्री, वह्या, कंपासपेटी, पेन, ड्रॉइंग नोट बुक, स्केच पेन अशा विद्यार्थ्यांना वर्षभरात लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कामी महाड मधील व्यावसायिक व मान्यवर मंडळींनी रोख रक्कम व वस्तु स्वरुपात अशी भरीव मदत केली.

प्रकाश धाटावकर सरांच्या अनोख्या उपक्र‌मातुन एक सि‌द्ध झाले की, आज देखील समाजाचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला आहे. पण मात्र गरज आहे ती समाजाचा विश्वास संपादन करण्याची.

यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ. सुनिता चांदोरकर, करंजखोल केंद्रप्रमुख स्नेहा वीरकर, निलेश गिरी, पर्यायी समन्वयक तालुका, सर्व दानशूर मंडळी, अमोल शहा, रत्नदिप ज्वेलर्सचे मालक बाबुलाल जैन, पवनराज अगरबत्तीचे मालक दिलखुष जैन, गावचे सरपंच नामदेव पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सहदेव उतेकर, उपाध्यक्षा साक्षीताई बाईत, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य मन्सूरभाई ताज, प्रत्येक वाडीतील अध्यक्ष महादेव जाधव, हनुमंत सिनगारे, संजय बाईत, रामचंद्र पवार, व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुभाष चव्हाण, ग्रामस्थ सोपान बाईत, तरुण मित्र मंडळ, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक प्रणिता माळवदे, उपशिक्षिका प्रतिभा देसाई, सुप्रिया पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!