तालुका

गोवंश हत्या रोखण्यासाठी हिंदू समाजाचा महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा 

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी सकल हिंदू समाज रायगड जिल्हा यांच्या मार्फत सकाळी ११ वा. चवदार तळे येथून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

रायगड जिल्ह्यात गोवंश हत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. हिंदू समाजाला अत्यंत श्रद्धेय आणि अध्यात्मिक दृष्ट्या प्रिय असलेल्या गोवंशाची दिवसाढवळ्या कत्तल होत आहे.

पोलीस प्रशासनाला त्याविषयी पूर्व कल्पना, माहिती देऊनसुद्धा वारंवार होणाऱ्या गोवंश हत्या रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. दिनांक १८ जून २०२४ रोजी महाडजवळील इसाने कांबळे येथे हिंदू समाजाचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर तेथील मुस्लिम जमावाने हल्ला केला. त्यात हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांच्यासमोर मारहाण झालेली आहे. पोलीसांनाही धक्काबुक्की झालेली आहे.

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही, पोलीस प्रशासन गोवंश हत्या थांबविण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. त्यामुळे निष्क्रीय प्रशासनाचा जाहीर धिक्कार करण्यासाठी शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी सकाळी ११ वा. चवदार तळे येथून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या वेळी सर्व हिंदू बंधु व भगिनीं या मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!