शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाड शहर महिला आघाडीच्या रणरागिनींच्या नियुक्त्या

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : 08 ऑगस्ट 2024 रोजी महाड शहरातील काकरतळे आणि सुंदरवाडी प्रभागातील संघटनात्मक कामाला गती मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाड शहरातील महिला आघाडीच्या काकरतळे व सुंदरवाडी प्रभागातील नियुक्ती कार्यक्रम पार पडला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा नेत्या स्नेहल दीदी जगताप व दक्षिण रायगड महिला संघटिका डॉ. स्वीटी गिरासे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा पानावकर यांनी केले.
काकरतळे येथील नवनिर्वाचित महिला पदाधिकारी
विभागप्रमुख स्वप्नाली योगेश शिंदे, उपविभाग प्रमुख राजश्री संदीप उतेकर, शाखाप्रमुख पल्लवी चंद्रकांत शिंदे उपशाखा प्रमुख अनुजा श्रीधर पानवकर, गटप्रमुख लीना राजू साळी, उपगटप्रमुख प्रज्ञा सागर शिंदे, युवती सेना गीता संदेश जाधव, सुंदरवाडी येथील नवनियुक्त महिला पदाधिकारी विभाग प्रमुख, प्रमिला प्रकाश राक्षे, उपविभागप्रमुख संध्या पराग बांदल, शाखा संघटिका मंगल राजेश सुर्वे, उपशाखा संघटिका सिद्धी गणेश पवार, गट प्रमुख भाग्यश्री नितीन राक्षे, उपगट प्रमुख रुंजी रणजित नाकते, युवती सेना विभाग प्रमुख माधुरी राक्षे, युवती सेना उपविभाग प्रमुख रश्मी सुर्वे अश्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांना स्नेहल जगताप यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाड महिला शहर प्रमुख तृप्ती रत्नपारखी, महाड शहर महिला संघटिका अस्मिता शिंदे, माजी नगरसेविका विद्याताई साळी, निताभाभी शेठ, गीतांजली मोरे, वाळण विभाग प्रमुख दिपाली मोरे, पूजा जगताप, अक्षया हेलेकर इत्यादी प्रमुख महिला उपस्थित होत्या.



