देश-विदेश
ब्रिटनची राणी एलिझाबेथ-2 यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
स्वप्नील ढवण – उपसंपादक
ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सातदशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचं आज वृद्धपकाळानं निधन झालं.
त्या 96 वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. या दरम्यान राजपरिवारातील सर्वसदस्य उपस्थित होते.
ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. ब्रिटनसह जगातील अनेकदेशांनी शोक व्यक्त केला आहे. एलिझाबेथ यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एलिझाबेथ यांच्यानिधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील.