निजामपूर विभागातील शिवसैनिकांचा संवाद मेळावा मुंबई दादर संपन्न

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा
दादर : 17 ऑगस्ट रोजी माणगाव तालुका मधील निजामपूर विभागातील शिवसैनिकांचा संवाद मेळावा मुंबई दादर येथील संत सेना महाराज सभागृहात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्सवात संपन्न झाला.

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नाना आंबवले यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले की भरतशेठ साठी आपण काम करत नसून आपणच भरत शेठ आहोत हे समजून येणाऱ्या निवडणुकीत जिद्द आणि चिकाटीने काम करावे, खरोखरच महाड विधानसभा मतदारसंघाचा कायापालट हा आमदार भरतशेठ गोगावले आमदार झाल्यापासूनच झालेला आहे, हजारो कोटी रुपयांचा निधी आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदार किंवा मंत्र्यांनी आणलेला नाही, तो निधी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणला आहे. याची आपण जाणीव ठेवून येणाऱ्या निवडणुकीत आपणच भरतशेठ आहोत हे समजूनच काम करावे अशी नाना आंबवले यांनी उपस्थिताना विनंती केली.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आमदार भरतशेठ गोगावले सांगितले की महाड विधानसभा मतदारसंघात असे एकही गाव शिल्लक नाही त्या ठिकाणी आपण शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे केली नाहीत, असा एखादा तरी गाव दाखवा आत्तापर्यंत हजारो कोटी निधी या मतदार संघासाठी आपण आणला आहे फक्त निधी आणलाच नाही तर विकास कामे देखील करून दाखवली आहे आणि उर्वरित विकासकामे आपण नक्कीच पूर्ण करणार यातील मात्र शंका नाही म्हणून आपण सर्वांनी एक मुखाने विकास कामांच्या मुद्द्यावर एकत्रित येऊन आपल्या गावाचा विभागाचा विकास करण्यासाठी शिवसेनेच्या पाठीवर राहून हातभार लावावा ही अपेक्षा करतो, आणि येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांची जागा आपणास दाखवून द्यायची आहे, हा संकल्प आपण आतापासूनच करायचा आहे.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख द रायगड विपुल उभारे, माणगाव तालुक्यामधील निजामपूर विभागातील गावाकडील आणि मुंबईतील शिवसेना, युवा सेना महिला संघटीका, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड मध्ये भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन
समीर पवार – शहर प्रतिनिधी बिरवाडी



