जिल्हा

माढा तालुक्यात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टर वर कारवाई

 

दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर

माढा : दि.28 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील मौजे मुंगशी येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. विजय राजेंद्र वलगे वय वर्ष 40 यांना इंदापूर पोलिस अंमलदार सलमान शेख व अमित यादव यांनी सायंकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंगशी गावातून अटक करण्यात आली. या कारवाईत भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 304 व भारतीय दंड संहिता कलम 34 तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 नुसार कलम 33 कलम लावण्यात आले आहेत.

डॉ. विजय राजेंद्र वलगे हा मुंगशी गावांमध्ये अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करत असताना कोणतीही डिग्री सर्टिफिकेट तसेच बायोमेडिकल वेस्ट सर्टिफिकेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रमाणपत्र नाहीत तरीही तो का गावामध्ये लोकांना सलाईन गोळ्या औषधही देऊन माणसावर उपचार करीत आहे, त्यामुळे माणसाच्या जीवित याला धोका निर्माण होत आहे अशातच इंदापूर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!