ब्रेकिंग
ब्रेकिंग न्यूज: महाडमध्ये पावसाचा हाहाकार; सुकट गल्लीत सावित्री नदीचे पाणी शिरले!
अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे!

सागर पवार – मुख संपादक
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले असून सखल भागांमध्ये वेगाने पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः सुकट गल्ली परिसराला याचा मोठा फटका बसला असून मुख्य बाजारपेठेकडे पाणी सरकत असल्याने शहरातपूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुख्य घडामोडी आणि सद्यस्थिती:
- सुकट गल्लीत पूर: महाडमधील सखल भाग असलेल्या सुकट गल्लीत सावित्री नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांची वव्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे.
- नद्यांनी ओलांडली इशारा पातळी: सततच्या अतिवृष्टीमुळे सावित्री आणि गांधारी नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढझाली असून नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत.
- बाजारपेठेकडे पाणी: सुकट गल्लीतून पुराचे पाणी आता महाड शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या दिशेने पसरत असल्यामुळेव्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

प्रशासनाकडून तातडीची पावले:
- शाळांना सुट्टी जाहीर: हवामान खात्याच्या रेड अलर्ट आणि अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी घोषित केली आहे.
- NDRF आणि बचाव पथके सज्ज: आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाडमध्ये NDRF टीम तैनात करण्यातआले असून स्थानिक प्रशासन नदीकाठच्या नागरिकांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
📣 प्रशासनाचा नागरिकांना आवाहन: नदीकाठच्या आणि सखल भागातील रहिवाशांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावेआणि अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे!



