तालुका

सव बौद्धवाडी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : महाड तालुक्यातील सव बौद्धवाडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना ह्या पक्षात जाहीर प्रवेश केला.

अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून विकास कामे होत नसल्यामुळे आणि शिवसेनेचा मतदारसंघात विकास कामांचा झंजावात पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे प्रवेश कर्त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

महेंद्र जाधव, सुनील शिंदे, रमेश शिंदे, राजेंद्र शेलार, वीरेश मोहिते, राकेश शेलार, मयूर जाधव, रोहन शिंदे, विकी मोहिते, निखिल मोहिते, संकेत शेलार, मिथुन जाधव, रोहित शिंदे, अमोल मोहिते, समीर मोहिते, सचिन शेलार, आकेश जाधव, उमेश जाधव तसेच यांच्या समवेत मुंबईकर भावकी स्थानिक ग्रामस्थ इत्यादींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सव सरपंच अनंत रेशीम, उपविभाग प्रमुख नामदेव रेशीम, माजी सरपंच वामने प्रवीण साळवी, युवासेना उपविभाग प्रमुख करंजाडी गण विनय बटावले, शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!