नांगलवाडी कालभैरव नगर मध्ये शिवजयंती उत्सव थाटामाटात साजरा
सुमेध साठे - ग्रामीण प्रतिनिधी महाड
नांगलवाडी कालभैरव नगर येथे गेल्या ७ वर्षांपासून शिवजयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात येते.
कालभैरव नगर हे एके काळी काही रोजगाराच्या शोधात आलेल्या लोकांनी मिळून छोटी अशी वस्ती निर्माण केली, पण आज तिचं वस्तीगेल्या काही वर्षांपासून एक कुटुंब प्रमाणे प्रतेकाच्या सुख दुखत सहभागी होत एक आदर्श निर्माण केला, कोणतेही उत्सव असुद्या एकत्रयेऊन थाटामाटात साजरे करतात.
शिवजयंती हि मोठया उत्सवात साजरी करण्यात आली, या निमित्त लहान मुलांचे डान्स, वेशभूषा, श्रेष्ठ दान म्हणजे रक्त दान अश्या इतर विविध कार्यक्रम आयोजिन या वेळी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी ही कालभैरव नगरातील तरुण पिढी ने उत्तम रित्या सांभाळली, या कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते नाडगाव तर्फे बिरवाडी गावचे सरपंच संजय देशमुख, राजू देशमुख, निलेश महाडिक यांच्या उपस्थितीमुळे नवीन पिढीला खूप मोठे प्रोत्साहन मिळाले.

या वेळी ग्रामपंचायत सरपंच संजय देशमुख, राजू देशमुख, निलेश महाडिक, कलंबे, उमेश शिर्के, राजेंद्र साठे, अभी कळंबे, अनिकेत देशमुख, प्रशांत वाघाटे, भाई जाधव, प्रणव देशमुख व कालभैरव ग्रामस्थ उपस्थित होते.


