क्रिडा व मनोरंजन

कुंभार आळी प्रीमियर लीग पुरस्कृत दिपक चव्हाण भव्य अंडरआर्म विद्युत झोतातील बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपन्न

प्रथम क्रमांक तिर्था इंटरनेट सर्व्हिसेस या सघांनी पटकावला

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : कुंभार आळी प्रीमियर लीग पुरस्कृत दिपक चव्हाण भव्य अंडरआर्म विद्युत झोतातील बॉक्स क्रिकेट स्पर्धा पर्व १ ले अत्यंत आनंदाने व खेळीमेळीच्या वातावरणात या कुंभार आळी येथे १३ व १४ मे रोजी संपन्न झाल्या. आळीतील ज्येष्ठ मंडळीच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करून सामन्याला सूरवात करण्यात आली, मागील दोन दिवस सुरू असणाऱ्या या सामन्याला आळीतील सर्व लहान व ज्येष्ठ क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती लावून या स्पर्धेची उंची वाढवली, प्रत्येक सामना हा ३ षटकांचा खेळवण्यात आल्याने प्रत्येक सामना हा अत्यंत चुरसीचा व मनोरंजक ठरला.

या स्पर्धेमध्ये कुंभार आळीतील १२ संघ मालकांनी आपल्या टीमची निवड करून आपले संघ मैदानात उतरवले होते, या मध्ये प्रथम क्रमांक तिर्था इंटरनेट सर्व्हिसेस या सघांनी पटकावला संघ मालक प्रतीक पलंगे व मार्गेश कांबळे, तसेच द्वितीय क्रमांक दोस्ती ग्रुप या संघाने पटकावले संघ मालक प्रसाद नातेकर व शिवराज गायकवाड, तृतीय क्रमांक नवरंग टीमने पटकावला संघ मालक अभीजित जंगम व ऋषिकेश टमके, तसेच चतुर्थ क्रमांक अयांश विहान फायर वॉल या संघाने पटकवला संघ मालक आदेश भालेकर व प्रतीक दळवी. तसेच मालिकावीर म्हणुन जगदीश साळुंखे,उत्तम फलंदाज प्रसाद नातेकर, व उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील शिरशिवकर यांनी सुंदर कामगिरी केली.

क्रिकेट स्पर्धा २ दिवस उत्तम रित्या पार पाडण्यासाठी खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल गुरव कुटुंबीयांचे आभार मनन्यात आले, कुंभार आळीतील सर्व ज्येष्ठ नागरिक व तरुण मुलांनी मेहनत घेतली त्या मुळे हे पर्व १ ले उत्तमरीत्या पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!