योगातून आरोग्याकडे’; वनश्री फार्म हाऊसवर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रोहा प्रतिनिधी (अक्षता जामकर) : शरीर आणि मन यांचा समतोल साधणाऱ्या योगाचे महत्त्व अधोरेखित करत धावीर वेलनेससेंटरच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. वनश्री फार्म हाऊसयेथे आयोजित या विशेष उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसह रोहा एमएससीबीचे अभियंता प्रदीप दालूआणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. उपस्थितांनी योगाभ्यासात सक्रिय सहभाग घेत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
योग सत्रादरम्यान नियमित योगाभ्यासाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शनकरण्यात आले. तणावमुक्त जीवन, शरीराची लवचिकता, मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता वाढविण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखितकरण्यात आले. तसेच व्यायामानंतर योग्य व संतुलित आहार घेण्याची गरज आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयीहीउपस्थितांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमानंतर सहभागींसाठी पौष्टिक नाश्त्याचे आयोजन करण्यात आले. चणा चाट आणि अंडी यांचा समावेश असलेल्या पौष्टिकआहाराचा सर्वांनी आस्वाद घेतला.
धावीर वेलनेस सेंटरच्या या उपक्रमामुळे आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचला. फिटनेस कोच ज्योती अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
