भोईराज फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईराज प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
लिलाव प्रक्रिये द्वारे 156 खेळाडूंची निवड
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड दि. 22 आयपीएल च्या धर्तीवर महाड मध्ये भोईराज फ्रेंड्स ग्रुप कडून भोईराज प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे 26,27 जानेवारी रोजी नवेनगर क्रीडांगण येथे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धे करिता 12 संघ असणार आहेत, त्यासाठी 12 संघ मालकांनी आपला प्रवेश निश्चित केला होता त्या स्पर्धेचा खेळाडू लिलाव कार्यक्रम नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे पार पडला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय ॲड. तेजेश अनंत मिंडे ( दासगांव ग्रा.प. उपसरपंच तथा भाजपा महाड तालुका उपाध्यक्ष), लक्ष्मण सोनू जाधव (दासगांव भोई समाज अध्यक्ष) प्रफुल्ल अनंत मिंडे (युवा उद्योजक तथा माझी तंटामुक्ती अध्यक्ष दासगांव) तसेच लक्ष्मण सयाजी पड्याळ, महेश हेमंत निवाते, प्रविना लक्ष्मण जाधव आणि अक्षय जाधव आदी उपस्थित होते.
भोईराज फ्रेंड्स तर्फे आयोजित या टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धे मुळे महाड तालुक्यातील खेळाडूंना आपले नैपुण्य दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. या मागे महाड तालुक्यातील अनेक गुणवंत खेळाडू पुढे येतील तालुका जिल्हा राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर नाव लौकिक मिळवतील या हेतूने ने या वर्षी नवेनगर महाड येथील मैदानावर या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत 12 संघ नी सहभाग घेत क्रिकेट मधील खेळाचा आनंद लुटला. या स्पर्धेकरिता महाड तालुक्यातील 230 खेळाडूंनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरला होता त्यातील एकूण 156 खेळाडूंची लिलाव प्रक्रिये द्वारे निवड करण्यांत आली. आयोजकांकडून स्पर्धेत सहभागी संघांच्या खेळाडू साठी टीशर्ट देण्यात आले.
या स्पर्धे करिता प्रथम पारितोषिक 50 हजार/ द्वितीय पारितोषिक 30 हजार/ तृतीय पारितोषिक 20 हजार/ चतुर्थ पारितोषिक 15 हजार असून इतर वयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत.

