५६ वा निरंकारी वार्षिक संत समागम सोहळा यंदा छत्रपती संभाजीनगर बिडकीन येथे आयोजित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते / पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
५६ वा निरंकारी वार्षिक संत समागम सोहळा यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित राहून निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. मानवजातीच्या कल्याणासाठी ते सतत कार्यरत असतात. निरंकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात, कोरोना कालखंडात निरंकारी मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कोरोना केंद्र उभारण्यात आली. महाड आणि चिपळूण येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराच्या वेळीही मला निरंकारी मिशनचे कार्यकर्ते मंडळी अखंड सेवा करताना दिसले. ठाणे मतदारसंघात देखील निरंकारी मिशनचे साधक अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवताना दिसतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कायम सहभागी होत असतात. तसेच २६ जानेवारी रोजी अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दलही निरांकरी मिशनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
यावेळी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगेंद्रसिंह जुनेजा, संत निरंकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि देश प्रदेशातून आलेले ३ लाखांहून अधिक साधक उपस्थित होते.
