राजकिय

पोलादपूर तालुक्यातील कुंभळवणे येथील राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

अभिजीत ढाणिपकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द हद्दीतील संपूर्ण कुंभळवणे गावाचा राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. आमदार भरतशेठ गोगावले आणि तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज जाहीर प्रवेश करण्यात आला.

यावेळी प्रवेश करत्यांचे भगव्या पताका घालून पक्षात स्वागत केले. तसेच मार्गदर्शनात आमदार भरतशेठ गोगावले सांगितले की तुमची जी राहिलेली विकास कामे आहेत ती म्हणजे पाणी योजना आणि रस्त्यासह इतर बाकीचे विकास कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील असे कुंभळवणे ग्रामस्थांना आश्वासित केले.

 या पक्ष प्रवेशासाठी तालुका प्रमुख निलेश अहिरे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतजी कळंबे, उपतालुका प्रमुख संजय मोदी, तानाजी निकम तसेच तालुक्यातील शिवसेनेचे आजी–माजी पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!