शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उसर नवीन वर्षांसाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रीक बाबींसाठी आढावा बैठक संपन्न
आढावा बैठक पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
मितेश महाले – सहसंपादक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उसर ता. अलिबाग येथील शैक्षणीक वर्ष २०२२–२३ साठी सर्व आवश्यक प्रशासकीय व तांत्रीक बाबींची पूर्तता चोख असावी, यासाठी पालक मंत्री आदिती तटकरे अध्यक्षतेखाली आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या व वसतीगृहात राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा, उपहारगृह, वाचनालय, सर्व आवश्यक साधन सामुग्रीयुक्त प्रयोगशाळा आदी सर्व बाबी कालबद्ध वेळेत पूर्ण कराव्यात. तसेच शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक त्या महाविद्यालयीन व शैक्षणिक सुविधा प्राधान्याने देण्याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना निर्देश दिले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक दिलीप म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे उपसचिवप्रकाश सुरवसे, अधिष्ठाता डॉ. कुर्रा, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सुखदेवे, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, प्रकल्प संनियंत्रण सल्लागार आदी उपस्थित होते.



