महाराष्ट्र

डी.टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण व वृद्धांना फळं वाटप

मितेश महाले – सहसंपादक

नांदेड, किनवट– प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण व वृद्धांना फळंवाटप करण्यात आले.

पत्रकारांच्या समस्या प्रभावीपणे सोडवणारी, त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावून येणारी सामाजिकतेचे भान ठेवून सामाजिक कार्यक्रमातआग्रहाने सहभागी होणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ गेल्या काही वर्षापासून संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात संघटना कार्यरत असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. या शासन मान्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांचा वाढदिवस आज दिनांक १०नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने किनवट तालुका कार्यकारणीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व संथगार वृद्ध आश्रमात फळं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

तसेच वाढदिवसाचे निमित्ताने किनवट तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांना प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे ओळखपत्र वनियुक्ती पत्र नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका सचिव नसीर तगाले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!