जिल्हा

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बिरवाडी यांच्या असहकार्या बद्दल बिरवाडी व्यापार्‍यांकडून बेमुदत उपोषण

स्वप्नील ढवण – उपसंपादक

यावर्षी 21 व 22 जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे दुकानदारांचे अतोनात नुकसान होऊन उद्ध्वस्त झाले आहेत, पोषण करणारे सर्वव्यापारी हे बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्जदार आहेत, ज्या वेळी कर्ज दिले होते त्यावेळी दुकानातील मालावर बँकेने तारण करून घेतला होता, बँकेने माल विमा उतरून दरवर्षी नूतनीकरण करत होते, बँकेच्या खात्यातून हप्ता रक्कम वजा करीत होते, मात्र यावर्षी 2021 करीता बँकेच्या हलगर्जीपणामुळे विमा नूतनीकरण केले नाही. त्यामुळे ‘फ्युचर जनरली‘ ह्या विमा कंपनीने दावा नाकारला त्यामुळे व्व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांनी ‘फ्युचर जनरली‘ विमा कडून दावा मंजूर करूनघ्यावा. जर बँक दावा मंजूर करण्यासाठी असमर्थ ठरली तर बँकेने सध्याची शिल्लक कर्ज माफ करावे व दाव्याच्या रकमेतून उरलेली रक्कम आम्हाला रोख द्यावी या प्रकारच्या प्रमुख मागण्या केल्या. राजिप सदस्य मनोज काळीजकर यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!