क्रिडा व मनोरंजन

राष्ट्रीय अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आतिफ लंबाडेची निवड

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड दि. 27 महाडमध्ये सुरु असणाऱ्या चॅम्पियन्स स्पोट्र्स अकादमीच्या खेळाडूंने मीनाताई ठाकरे स्पोट्र्स कॉम्प्लेक्स नाशिक येथे २१ ते२२ सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या अथलेटिक्स स्पर्धेत, चॅम्पियन स्पोर्ट्स अकादमी व अंजुमन ए इस्लाम अल्लानाइ न्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईचा खेळाडू आतिफ अब्दुल सत्तार लंबाडे याने डेकॅथलॉन या क्रीडा प्रकारात ५३३२ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

त्यामुळे बेंगळूरू येथे होणाऱ्या ६१ व्या राष्ट्रीय खुल्या अथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे अकॅडमीचे अध्यक्ष सचिन शिर्के व इतर पदाधिकारी यांनी त्याचे कौतुक केले व खेळाडूला विनायक शिर्के व प्रा. समीर गाडगीळ यांचे विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले आहे. लतीफ लंबाडे यांनी मिळवलेल्या यशाचे महाड पोलादपूर तालुक्यात कौतुक केले जात असून, त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!