जिल्हा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 18.00 मि.मी. पावसाची झाली नोंद

प्रतीक पलंगे – जिल्हा प्रतिनिधी रायगड

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.18 मि.मी इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3650.73 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुका निहाय पावसाची नोंद अलिबाग– 16.00 मि.मी., पेण– 13.00 मि.मी., मुरुड– 11.00 मि.मी., पनवेल– 5.00 मि.मी., उरण-9.00 मि.मी., कर्जत– 14.60 मि.मी., खालापूर– 24.00 मि.मी., माणगाव– 22.00 मि.मी., रोहा– 37.00 मि.मी., सुधागड-30.00 मि.मी., तळा-11.00 मि.मी., महाड– 12.00 मि.मी., पोलादपूर-9.00 मि.मी, म्हसळा– 34.00 मि.मी., श्रीवर्धन-31.00 मि.मी., माथेरान– 12.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान290.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 18.18 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 113.50 टक्के इतकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!