जिल्हा

पंधरा वित्त आयोग महिला सक्ष्मीकरणासाठी खर्डी ग्रामपंचायती मध्ये स्तुत्य उपक्रम

माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले यांच्या उपस्थितीत महिला गृह उपयोगी विविध साहित्यांचे वाटप

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : पंधरा वित्त आयोग महिला सक्ष्मीकरणासाठी खर्डी ग्रामपंचायती मध्ये स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले यांच्या उपस्थितीत महिला गृह उपयोगी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या गावाला पाच रुपयांमध्ये वीस लिटर पाणी शुद्ध फिल्टर केलेले आरोप्लॅन चे मिळणार आहे, त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी राहण्यास नक्कीच मदत होणार आहे, यावेळी सुषमाताई गोगावले यांनी सदर उपक्रम अमलात आणल्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार मानले.

हा उपक्रम जर सर्वच ठिकाणी खेडोपाड्यात देखील राबवला तर सर्वांचे आरोग्य सदृढ राहण्यास नक्कीच मदत होईल असे सपना मालुसरे यांनी सांगितले. आणि महिलांनी देखील आता सक्षमीकरणाच्या माध्यमातून पुढे येणे गरजेचे आहे कारण शासनाच्या माध्यमातून आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नाने छोटे मोठे उपक्रम उद्योगधंदे करण्यासाठी नक्कीच आमदार साहेबांची मदत मिळत आहे, त्यामुळे याचा लाभ आपण महिलांनी घेणे नक्कीच गरजेचे आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या सिंहासना वरील पुतळ्यास आणि श्रीमंत हरीराजे परसोजी राजे महाडिक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

या वेळी महाड विधानसभा महिला संघटिका सपना मालुसरे, ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!