जिल्हा

आदिवासी भागातील गोर गरीब जनतेच्या मागण्यांचे निवारण करण्यासाठी आमदार नितीन ए टी पवार यांनी राबविला उपक्रम

मितेश महाले – सहसंपादक महाराष्ट्र राज्य

आमदार नितीन ए टी पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य उपक्रम राबविला, सुरगाणा दि . 17 सप्टेंबर  रोजी कळवण / सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन भाऊ ए.टी.पवार यांनी सुरगाणा शासकीय विश्रागृह येथे तालुका स्थानिक सभा भरवून आदिवासी भागातील गोर गरीब जनतेच्या मागण्यांचे निवारण केले. तालुक्यातील आदिवासी बांधवांनी खावटी, विद्युत जोडणी, घरकुल योजना, निराधार पेन्शन योजना, गावातील रस्ते, स्रीयांच्या आर्थिक समस्यांचे अश्या अनेक मागण्यांसाठी निवेदन करण्यात आले. तसेच आमदार यांनी जनतेला त्यांची सगळी कामे पूर्ण होतील अशी अश्वासन दिले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चिंतामण गावित, राजू पवार, तसेच कृषी अधिकारी, बी. डी.ओ. महावितरण केंद्र अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!