जिल्हा

पत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उमरखेडच्या बैठकीत निर्णय

मितेश महाले – सहसंपादक

यवतमाळ, उमरखेड : राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मासिक बैठक उमरखेडयेथे शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पार पडली. पत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही असा प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ, उमरखेडच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.

यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या सर्कल मधील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोडयांच्या उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे यांनी पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी संघटनेच्या कुठल्याही व्यक्तीवर जर अन्याय झाला तर कदापीही खपवून घेणार नाही. कुठल्याही प्रकारेअन्याय सहन करणार नाही. व पत्रकारांच्या मागे आपली संघटना सदैव उभी असेल असे आश्वासन दिले. संघटनेची दरमहा बैठक होत असते. व त्यामध्ये पत्रकारांच्या समस्या सोडवल्या जातात. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे नियमित पणे संघटना पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य ते मार्गदर्शन करीत असतात. या बैठकीमध्ये काही नवीन पत्रकारांना संघटनेमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी संघटनेचे  जिल्हाअध्यक्ष अनिल राठोड, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, यवतमाळ जिल्हा युवाध्यक्ष उदय पुंडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मोहन कळमकर, कार्याध्यक्ष गजानन गंजेवाड, तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे, उपाध्यक्ष सुनील ठाकरे, संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक हरिदास इंगोलकर,भागवत काळे, कमलाकर दुलेवाड, मैनुदिन सौदागर, गजानन वानखेडे, संजय जाधव, संदेश कांबळे, गजानन नावडे, मारोतराव रावते, कय्युम नवाब, प्रेमकुमार भारती, पंकज गोरे, वसंता नरवाडे, बाजीराव रावते संघटनेचे आदी पदाधिकारी व सदस्य बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!