वरंध ग्रामपंचायत उपसरपंच पदी आदिवासी समाजाचे मंगेश पवार शिवसेनेचा करिष्मा
शिवसैनिकांनी दिलेला शब्द केला पूर्ण

मयूर महाडिक – उपशहर प्रतिनिधी महाड
वरंध ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून आज पर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी मतदार बांधव असताना देखील सरपंच किंवा उपसरपंच पदापासून वंचित ठेवण्यात आले असून, इतर पक्षाने फक्त मतदाना पुरता त्यांचा वापर करून घेतला असून फक्त शिवसेनापक्षाने समानतेचा न्याय देते, आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिलेला शब्द पूर्ण करत उपसरपंच पदी वरंध आदिवासी वाडी येथील मंगेश पवार यांना बिनविरोध निवडून देण्यात आले.
यामुळे आदिवासी बांधवांनमध्ये पक्षावर असलेले प्रेम त्यांच्या चेहर्यावर दिसून आले.
या वेळी माजी सभापती सपनाताई मालुसरे, विद्यमान सरपंच संगीताताई सपकाळ, उपविभाग प्रमुख सुनील कोंडाळकर, शाखा प्रमुखविकास धनावडे, शाखा प्रमुख अविनाश देशमुख, माजी उपसरपंच राजेश जांभळे, वरंध ग्रामपंचायतीमधील सदस्य, शिवसैनिक, महिला भगिनी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



