ब्रेकिंग

माणगावजवळ बसला भीषण अपघात; १ ठार तर 37 प्रवासी जखमी

अक्षय जाधव – शहर प्रतिनिधी माणगाव

कर्जत / माणगाव – माणगावजवळ निजामपूर – पाचाड मार्गावर साई ट्रँव्हलच्या बसला अपघात झाला आहे, रायगड किल्ल्यावरुन माणगाव व निजामपुर कडे जाणा–या मार्गावरील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली.

या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 37 प्रवासी जखमी आहेत. यातील सहा प्रवाशी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

अपघातग्रस्त बसमधील प्रवासी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील रहिवासी आहेत, एम. एच 04 एफ के 7799 या क्रमांकाच्या बसने ते रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते,  त्यांची बस निजामपूर – पाचाड मार्गावर आली असता एका वळणावर हा अपघात झाला, यात चालक विजय भगवान नागंरे यांचा मृत्यू झाला आहे. बसमधील 37 प्रवाशांपैकी १५ प्रवाशी गंभीर असल्याची माहिती आली आहे.

१५ गंभीर जखमी प्रवाशांवर अलिबाग जिल्हा रुग्णालय व मुबंई येथे हलविले, अन्य जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!