पुणे / सोलापूर जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश
बारामती, दौंड, इंदापूर आणि सोलापूर - करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा
मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे जाहीर प्रवेश केला.
करमाळा विधानसभेचे माजी आमदार नारायण पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे, वरवंटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, देविदास भोंग, वैभव जामदार, विजय मदने, आंनद यादव, अरविंद बगाडे, अंकुश घनवट, डॉ. विशाल खळदकर, अशोक फडतरे, सोमनाथ माकर, दीपक भांडलकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांचा यात समावेश होता. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी माजी मंत्री विजयबापू शिवतारे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

