जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा महाड येथे संपन्न
राकेश देशमुख - जिल्हा प्रतिनिधी रायगड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून दि. १३ एप्रिल २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महाड येथे परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सल्लागार, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच महाड, पोलादपूर, माणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी महाड तालुक्यातील व शहरातील शिवसेना, काॅग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात प्रवेश केला.



