आरोग्य व शिक्षण

कुर्ले विद्यालयाची १००% निकालाची हॅट्रीक

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

जनहीत सेवा संस्था महाड संचलित कै. तात्यासाहेब नातू माध्यमिक विद्यालय कुर्ले, महाड यांनी आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत, सलग तीन वर्षे शाळांत  प्रमाणपत्र परीक्षेत १००% निकाल लावून, १००% निकालाची हॅट्रीक केली आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक कु. लोखंडे रोशनी राम (84.80%), द्वितीय क्रमांक – कु. तिटे सुमित बबन (81.60%) आणि तृतीय क्रमांक कु. जंगम साहिल रमेश (80.60%) अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थापक, अध्यक्ष – शेखर ताडफळे, संस्था संचालक आश्रय ताडफळे, शाळा समिती अध्यक्ष– दत्ताराम मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सदस्य – संदिप सकपाळ, शाळेचे मुख्याध्यापक – अनंत शेलार संस्था सहसचिव– संतोष महाडीक, शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!