कृषीवार्ता

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा २५० रुपयाचा दुसरा हप्ता जमा आ. बबनराव शिंदे

दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप हंगाम २१–२२ मध्ये युनिट १ पिंपळनेर आणि युनिट २ येथे गाळप केलेल्या उसासाठी प्र.मे. टन रु २५० रुपये प्रमाणे बँक खात्यात जमा करण्यात आलेची माहिती कारखान्याचे संस्थापक चेरमन आ. बबनराव शिंदे यांनी दिली आहे.

विठठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट १ पिपळनेर येथे लाख ७८ हजार ९२२ २४. मे. टन उसाचे गाळप करून ११.५२टक्के साखर उतारा आहे, २३ लाख ४५ हजार मिटल साखर उत्पादित केलेली आहे, तसेच महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक आलेला आहे.

कारखान्याचे ऊस गळीत हंगाम २१–२२ चे कमिशन डिपॉझीट रक्कम उस वाहतुकदारांना जमा केलेली आहे, हंगाम २२ – २३ ऊस गाळप हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्यासाठी तोडणी वाहतुक पहिला अॅडव्हास जमा करण्यात आला अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बबनराव शिंदे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!