मुरुड जंजिरा दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे
विवेक चाफेकर – तालुका प्रतिनिधी मुरुड जंजिरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे दि. ५ जुलै ते ११ जुलै दरम्यान कोकणातील महासंपर्क दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान युवा नेते अमित ठाकरे मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या तसेच त्या त्या भागातील नागरी समस्या जाणून घेतल्या, मनसे पक्षाचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने व पक्ष तळा गाळात पोहोचविण्याच्या दृष्टीने दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या दौऱ्याचा एक भाग म्हणून उत्तर रायगड मधील रविवार दि. १० जुलै २०२२ रोजी युवा नेते अमित ठाकरे यांनी मुरुड तालुक्याला भेट दिली. मुरुड जंजिरा मधील नवीन शाखेचा उद्घाटन देखील या दौऱ्यादरम्यान करण्यात आले, यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



