तालुका
अर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान रा. जि. प. शाळा विन्हेरे येथे संपन्न
नाबार्ड स्थापना दिनाच्या औचीत्याने राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबागयांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
दि. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. शाखा विन्हेरे येथे दि. 07 जुलै रोजी नाबार्ड स्थापना दिनाच्या औचित्याने अर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान राबविण्यात आले. हे अभियान रा. जि. प. शाळा विन्हेरे येथे घेण्यात आले असून त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बँक योजनेची माहिती देण्यात आली, त्यांना पुढील वाटचालीसाठी बँकेतील योजना कशा उपयुक्त आहेत हे सांगण्यात आले आणि त्यांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
या वेळी विन्हेरे शाखेचे शाखाधिकारी सुमेधा घोसाळकर, बँकेचे कॅशियर नितिन चांदोरकर, सोपान दळवी व शिक्षक वर्ग इतर पदाधिकारी उपस्थित होते.




