महाराष्ट्र

नांदेड व हिंगोली जिल्ह्यामधील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

अभिजीत ढाणीपकर – शहर प्रतिनिधी महाड

नांदेड दौऱ्यांतर्गत गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कॉऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटच्या कॉर्पोरेट ऑफिसला भेट देऊन त्यांच्या ‘सहकारस्पर्श‘ यानुतन  कार्यालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याच बरोबर भक्ती लॉन येथील मेळाव्यात नांदेड शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन ही झाले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकावेत आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय मिळवून देतायावा यासाठी हा उठाव केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील चार विकासकामांचे भूमीपूजन याप्रसंगी करण्यात आले. नांदेड–पूर्णा या १३.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ९० कोटी, नांदेड– वसमतया १८.५० किलोमीटर रस्त्याच्या कामाकरिता ५५ कोटी, आसना नदीच्या पुलाच्या कामाकरिता १३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. याशिवाय रस्ते सुधारणे कामाकरिता १०० कोटी तसेच शहरांतर्गत मलनिस्सारण योजनेसाठी नगरोत्थान योजनेतून ३२८ कोटी रुपयांचानिधी दिल्याचे सांगितले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला साथ दिलेली असून त्यांच्या मतदारसंघातील कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यासमयी त्यानी बोलताना दिली.

याप्रसंगी नांदेड जिल्हाप्रमुख आनंद बोडाळकर, उमेश भोंडे तसेच १२ तालुकाप्रमुखांनी युती सरकारला आपला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संजय राठोड, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, गोदावरी

अर्बन मल्टीस्टेट कॉ–ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन सौ. राजश्री पाटील, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे, सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!