जिल्हा

शिवसेना शिंदे गटाच्या रायगड जिल्हा प्रमुख पदी राजाभाई केणी यांची निवड

जिल्हाप्रमुख पदाचा पदभार स्वीकारन्यापूर्वी डॉ. आपासाहेब धर्माधिकारी यांची घेतली भेट

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: राजकारणाच्या उलाढालीनंतर शिवसेनेच्या कोणत्याच भूलथापांना बळी न पडता राजाभाई केणी यांनी रायगडचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी खंबीरपणे एकनिष्ठेने उभे राहून पाठिंबा दिला, शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळाले.

रायगडच्या तिन्ही आमदारांच्या सहमतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजाभाई केणी यांची शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रायगड जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली, या निम्मित आज रायगड जिल्हा प्रमुख पदाचा पदभार स्विकारणार म्हणून जेष्ठ निरुपणकार आदरणीय तीर्थस्वरूप डॉ. आपासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली, कोणतेही कार्य करण्यापूर्वी श्री च्या विचाराने निर्णय घेऊनच कार्य केल्यास त्यात यश आणि सामर्थ्य निश्चित प्राप्त होते, याच विचारातून पुढे चालण्यासाठी ह्या भेटीतून आगामी काळातील देशकार्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे ह्याच अनुशंघाने भेट घेतली असे सांगितले, डॉ. आपासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेऊन राजाभाई केणी यांनी जिल्हाप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!