महाराष्ट्र
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण
अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
अभिजित ढाणिपकर – संपादक कोकण विभाग
मुंबई : मंत्रालयात आज महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आजी / माजी मंत्री, आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, चित्रकार राजेश सावंत यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
