कीये येथे स्थानिक आमदार विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण
सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : महाड तालुक्यातील किये खोताचे आवाड येथे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून आणि महाड तालुका संपर्क प्रमुख प्रमोद दादा गोगावले यांच्या पाठपुराव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते व युवासेना कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, संपर्कप्रमुख एकनाथ सुकूम, विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले, गोपीनाथ सावंत, लक्ष्मण वाडकर, विष्णू गोगावले, सरपंच नारायण वाढकर, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि या भागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात आला, यावेळी आमदार गोगावले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, या पंचक्रोशीत आपण विकास कामांचा झंजावात उभा केला असून आणखी या गावासाठी निधी लागला तरी तो देण्याचे अभिवचन देण्यात आले या गावाने या विभागांनी आमच्या वरती भरभरून प्रेम केलेले आहे याची पूर्ण जाणीव आम्ही ठेवलेली आहे आणि ती कधीही विसरणार नाही आपण सर्व एका नात्यागोत्यात गुंतलेले आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे हेवे दावे न करता असेच एकत्रितपणे राहून आपण या भागाचा कायापालट करू आणि आपले प्रेम सहकार्य असेच या पुढेही आमच्यावरती राहील अशी अपेक्षा करत सर्वांना धन्यवाद दिले.



