जिल्हा
बिरवाडी वेरखोले येथे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी मोठया उत्सवात शिवजयंती साजरी
रायगड जिल्ह्यात तिथीनुसार शिवजयंतीचा जल्लोष
नितेश पवार – ग्रामीण प्रतिनिधी बिरवाडी
महाड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिथीनुसार जयंतीनिमित्त शिवप्रेमींनी अभिवादन केले. रायगड जिल्ह्यातील विविध गड, किल्ल्यांसह सर्वत्र सार्वजनिक शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली. शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, यानुसार शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता.

महाड तालुक्यातील बिरवाडी वेरखोले येथे दर वर्षी प्रमाणे या ही मोठया उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
मिरवणुका, शिवरायांच्या पूजनही देखील करण्यात आले, तसेच सातरा मधील प्रसिद्ध व्याख्यानकार विनोद निकम यानी शिवप्रेमींना व्याख्यान देखील सांगितले.
या वेळी वेरखोले गावातील पंच कमिटी, ग्रामस्थ, तरुण, महिला मंडळ उपस्थित होते.



