जिल्हा

किल्ले रायगडावर दरड कोसळली; शिवप्रेमीचा मृत्यू

किल्ले रायगडला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात, अशातच दरड कोसळून एका पर्यटकाचा मृत्यू झाला

 

अमीर जाधव – ग्रामीण प्रतिनिधी पाचाड 

रायगड : किल्ले रायगडावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका शिवप्रेमीचा मृत्यू झाला आहे. स्वराज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या किल्ले रायगडावर नुकताच शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. किल्ले रायगडला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. यामुळे रागडावर जाताना पर्यटकांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत गुंड असं मृत पर्यटकाचे नाव आहे. 29 वर्षीय प्रशांत मूळचा सोलापूरचा असून सध्या पुण्यात वास्तव्याला आहे. तो मित्रासोबत रायगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. तिथून पायी परतत असताना अंगावर दरड कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!