जिल्हा
रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी
मिलिंद पवार – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड जिल्ह्याच्या 04 जून रोजी काही भागात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. कर्जत, खालापूर, महाड तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झालय. वादळी वा-यांमुळे खोपोलीत झाडं आणि विजेचे खांब कोसळले आहेत. तर या पावसामुळे माथेरानमध्ये आलेले पर्यटक सुखावलेत.



