जिल्हा

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची बाल कल्याण समिती कॅम्पला भेट

 

संजय पाटील – तालुका प्रतिनिधी रोहा 

रायगड: माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीर्वधन, म्हसळा व तळा तालुक्यातील अनाथ, निराधार एक पालक असणाऱ्या मुलांकरिता बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याच्या उदेशाने पंचायत समिती माणगाव येथे दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी बाल कल्याण समितीचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देवून तेथील कामाचा आढावा घेतला.

यावेळी महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे, सदस्य राम मस्के, अॅड. शुभांगी झेमसे, बाल संरक्षण कक्षाचे अजिनाथ काळे हे उपस्थित होते.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये असे कॅम्प आयोजित करुन जास्तीत जास्त अनाथ, निराधार एक पालक असणाऱ्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्यावा व तालुक्यातील एकही बालक या पासून वंचित राहु नये यांची दक्षता घ्यावी. तसेच त्यांच्या शिक्षणात, विकासामध्ये खंड पडणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागामार्फत योग्य ते पयत्न करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्यात एकूण 232 मुलांनी व पालकांनी सहभाग घेवून योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!