जिल्हा
महाड न्यायालयात ई फायलींग आणि फॅसिलीटी सेंटरचा शुभारंभ
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : दि. २४ महाड दिवाणी न्यायालयात आज ई फायलींग आणि फॅसिलीटी सेंटर या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधिश ए. एस. राजंदेकर यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. पक्षकरांना याचा लाभ होणार आहे.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून या सुविधेसाठी संगणक, प्रिंटर, युपीएस, वायफाय, व्हिडीओ कॉन्फरसिंग या सुविधा, या सेंटरसाठी महाड वकील बार असोसिएशनला उपलब्ध करून देण्यात आले.
अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर ही सुविधा असणारे महाड दिवाणी न्यायालय हे दुसरे न्यायालय आहे.



