महाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख पदी सुदेश कलमकर यांची निवड
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
शिवसेना भवन, दादर, मुंबई येथे अनंतजी गिते माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते आणि दक्षिण रायगड संपर्क प्रमुख संजय कदम, माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाड शहर प्रमुख पदी महाडचे माजी नगराध्यक्ष सुदेश कलमकर यांची निवड करण्यात आली.
एक व्यक्ती एक पद यानुसार आज चेतन पोटफोडे यांच्या वर महाड शहर प्रमुख आणि जिल्हा युवा सेना अधिकारी अशी दोन पदाच्या जबाबदाऱ्या होत्या. दोन्ही पदाना योग्य न्याय देण्याचे काम चेतन पोटफोडे करत होते, परंतु पक्षाचा आदेश मानून चेतन पोटफोडे यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्या जागेवर आज सुदेश कलमकर यांची शिवसेना नेते अनंतजी गिते साहेब यांनी शहर प्रमुख पदी सुदेश कलमकर यांची निवड केली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मावळते शहर प्रमुख तथा दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी चेतन पोटफोडे, महाड संपर्क प्रमुख अमित मोरे, महाड विधानसभा सह संपर्क प्रमुख चंद्रकांत धोंडगे, जिल्हा युवा सेना समन्व्यक सुधीर ढाणे,धनंजय देशमुख, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख सुभाष मोरे, महाड शहर संपर्क प्रमुख विजय तांबट, उप शहर प्रमुख विजय जाधव, मंगेश देवरुखकर, वाळण विभाग प्रमुख निलेश धुमाळ, मांजरवणे विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर, युवा शिवसैनिक बाळा साळवी राजू शिंदे, राजेंद्र सपकाळ,सचिन शिंदे, पिंट्या मोरे, सुबोध यादव, वेदांत मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



