क्रिडा व मनोरंजन

महाड मधील कु. श्रावणी शिंदे रायगड जिल्हा शालेय थाळी फेक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

महाड : महाड सरेकर आळी मधील कु. श्रावणी निलेश शिंदे हिने रायगड जिल्हा शालेय थाळी फेक स्पर्धेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवीला आहे, आता ती महाराष्ट्र राज्य पातळीवर थाळीफेक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला आणि तिला पुढील भावी उज्वल आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

महाड नगरीत भविष्यात मोठ मोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्पर्धक उदयाला यावे आणि त्यांचा असाच सत्कार व्हावा व आपल्या महाड शहराचे नाव मोठे करावे, आणि मोठे होत राहावे अशीच प्रत्येक पालकांची अपेक्षा असते.

संपूर्ण महाड तालुक्यातील नागरिकांकडून आणि नातेवाईक श्रावणी निलेश शिंदे हिचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!