जिल्हा

एक तारीख एक तास स्वच्छता मोहिमेला रायगड जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद

जिल्हाधिकारी डॉ. म्हस्के यांच्या उपस्थितीत काशीद समुद्रकिनारी मोहिमेचा शुभारंभ

 

बंटी पाटील – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड 

अलिबाग दि.१ जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण ठिकाणी “एक तारीख एक तास” ही स्वच्छता मोहीम लोकसहभागातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली. लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, नागरिक, विद्यार्थी , स्वयंसेवक, शासकीय अधिकारी कर्मचारी आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या मोहिमेत सहभाग घेतला. उद्या (२ ऑक्टो) रोजी महात्मा गांधी यांची जयंती असून त्यानिमित्त स्वच्छतेची मोहीम ही लोक चळवळ झाली दिसून आले. नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते . काशिद समुद्र किनारी येथे जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या हस्तेे शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , मुरुड तहसीलदार राहुल शिंदे, यासह काशीद विद्यालय, अंजुमन इस्लाम महाविद्यालयाचे विद्यार्थी, युवक ,ग्रामस्थ , स्थानिक लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

 

जिल्हाधिकारी डॉ. म्हस्के यांच्या उपस्थितीत काशीद समुद्रकिनारी नागरिकांचा मोठा सहभाग लाभला. स्वच्छतेत रायगड जिल्हा अव्वल स्थानी नेण्यासाठी याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. या मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद व्यक्त केले. यावेळी समुद्रकिनारी ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्र टाकण्यासाठी उभारण्यात आलेल्या डस्टबिनचे तसेच महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन च्या वेंडिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वच्छता मोहिमेत समुद्रकिनारी अंमली पदार्थांचे पाकिट आढळून आले .

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!