निजामपूर विभागात २१ कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
येत्या विधानसभा निवडणुकीत भरतशेठ गोगावले पहिल्या दहा मध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारे आमदार असतील - मंत्री उदय सामंत
निजामपूर ग्रामपंचायतचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, सदस्य, हजारो ग्रामस्थ महिला भगिनींचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड : निजामपूर विभागात २१ कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आणि निजामपूर ग्रामपंचायतचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, सदस्य, हजारो ग्रामस्थ महिला भगिनींचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री/ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की मी भरतशेठ गोगावले सारखा जनतेची कामे करून घेणारा आमदार महाराष्ट्रात पाहिला नाही, चार वेळाच काय दहा वेळा जनता निवडून देईल, तसेच २०२४ च्या पुढील निवडणुकी पहिल्या १० मध्ये भरतशेठ गोगावले यांचा सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा नंबर असेल, अशी कामे ते महाड विधानसभा मतदारसंघात करत आहेत असे सांगितले.

युवा सेनेचे महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य आणि युवा नेते विकासशेठ गोगावले यांनी सांगितले की औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे, कारण स्थानिकांच्या जागा जमिनी या प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत, या ठिकाणचा शेतकरी भूमिहीन झाला आहे, त्यांच्या या मागणीची मंत्री महोदयांनी दखल घेत पंधरा दिवसात सर्वांची बैठक बोलावतो असे आश्वासन दिले.

यावेळी मंत्री महोदय यांनी महाड विधानसभा मतदारसंघाकरिता भरघोस निधी दिला आहे, निजामपूर विभागात नळ पाणीपुरवठा योजनेकरीता २१ कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल आमदार भरतशेठ गोगावले यांनी आभार मानले.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री/ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा या परिसरात २५ ते ३० फुटांचा पुष्पहार क्रेनच्या मदतीने घालण्यात आला, जागोजागी निजामपूर वाशी यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली, त्यामुळे वातावरण एकदम भगवेमय आणि प्रसन्न झाले होते.
या वेळी निजामपूर विभागातील मुंबई, ठाणे, पुणे, सुरत येथील चाकरमानी आणि माणगाव तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



